उरण | वार्ताहर |
उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी पिस्तुल बाळगणार्या दोघांना गाडीसह उरण पोलिसांनी अटक केली आहे. पिरवाडी समुद्र किनारी असलेल्या हेलिपॅड जवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या जीपमध्ये दोघेजण पिस्तुल घेऊन आल्याची खबर लागली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाड टाकताच त्यांना जीप गाडीजवळ निल राजभर(35) आणि राज थळी(32) हे पिस्तुल घेऊन असल्याचे आढळले. त्वरित पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेतले आहे. आरोपी कडून भारतीय बनावटीचे एक लोखंडी धातूचे पिस्तुल, एक मॅगझीन, जिवंत काडतुस व जीप गाडी नंबर एमएच 02 ईयु 5294 हस्तगत करण्यात उरण पोलिसांना यश आले. याची अंदाजे बाजारपेठेत किंमत 925000 आहे. अधिक तपास सपोनि विजय पवार हे करीत आहेत.







