पुणे | प्रतिनिधी |
पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांना आता मोठे पुरावे सापडत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 90 लाख रुपये आणि सोनं जप्त करण्यात आलं होतं. त्याच प्रकरणात आता पोलिसांना आणखी माहीती हाती लागली असून, आता तब्बल 2 कोटींचं रुपयांचं घबाड त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण उलगडत चाललं असल्याचं दिसतं आहे. म्हाडा,टीईटी आणि सैन्य भरतीचे परीक्षांमध्ये यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत.
तुकाराम सुपेच्या घरात मिळले 2 कोटी रुपयांची कॅश आणि सोनं मिळालं आहे. यापूर्वी मिळले होते 88 लाख रूपये मिळाले होते. आज दुसर्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी घबाड सापडलं आहे. पोलिसांच्या तपासात घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने केली हस्तगत करण्यात आली आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटीहुन अधिक रक्कम आणि सोने मिळालं असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. या सर्व घोटाळ्यांतील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील. अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही.
देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते






