अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर गुरुवारी (दि. २३) आंदोलन करणार आहे. मुंबई व ठाणे शहरी भागातील अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करा, नवीन उत्तम मोबाईल, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका पदांवर ५० टक्के पदे विनाविलंब अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावी, अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदे विनाविलंब भरण्यात यावी, शहरी अंगणवाडी केंद्राची भाडेवाढ देण्यात यावी, सेवानिवृत्तीचे पैसे विना विलंब द्या, मिनी अंगणवाडी सेविकांना समान काम समान वेतनानुसार सेविकाएवढे मानधन द्या, मिनी अंगणवाडी सेविकांना उन्हाळी व दिवाळी रजा लागू करावी, ३ अपत्यांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, १०/२० व ३० वर्षाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा, आदी मागण्या आहेत.







