। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गुहागर तालुक्यातील शेतकरी महिलांना उमेद अंतर्गत भाजीपाला प्रशिक्षणाचा कार्यक्रम पाटपन्हाळे ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे राबविण्यात आला. यामध्ये महिलांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा वाटा असलेली परसबाग विषयावर कृषी विभागाचे प्रतिक बांगर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनाअंती प्रशिक्षणावर महिला शेतकरी भगिनींना प्रश्न विचारण्यात आले व योग्य उत्तर देणार्या महिलांना कृषी विभागातर्फे बक्षीस देण्यात आले. यामध्ये अनुष्का घाणेकर (असगोली), राधिका कदम (चिखली), अमिषा गमरे (मुंढर), जानवी किरवे (पालशेत), दिपाली गमरे (चिखली), ऋषिका चांदिवडे (चिखली), साक्षी चव्हाण (पाटपन्हाळे), ऋतिका दळवी (चिखली) या महिलांनी योग्य उत्तरे देऊन बक्षिसे मिळवली.