। वेणगाव । वार्ताहर ।
गेली कित्येक वर्षे आपल्या भजन, किर्तन, प्रवचन, संप्रदायांच्या माध्ममातून महाराष्ट्रात संतांच्या विचार धारेची परंपरा हभप बुवा, महाराजांनी जोपासली आहे असे उद्गार खा.सुनील तटकरे यांनी सांगवी येथील हभप बुवा महाराजांचा सत्कार समारंभ सोहळा प्रसंगी आपले विचार मांडले. कर्जत तालुक्यातील सांगवी येथे सोमजाई माता मंदिर जीर्णद्वार, सोमजाई माता, शिवलिंग, पार्वतीमाता व नंदी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिस्थापना व कलशारोहन सोहळ्याप्रसंगी अप्पा घारे, खाडपे ग्रा.मा.सरपंच मधुकर घारे यांच्या सहकार्यातून सुधाकर घारे रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती यांच्या पुढाकाराने कर्जत-खालापूर तालुक्यातील समस्त हभप बुवा महाराजांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हभप बुवा महाराजांना शाल पुष्पगुच्छ व श्री विठ्ठल रुख्मिची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यात मारुती महाराज राणे हलवली कर्जत, रामदास महाराज पाटील वावोशी, तानाजी महाराज कर्णूक धाकटी पांढरी, महादेव महाराज मांडे रिसवाडी, आनंद महाराज खंडागळे चौक, कैलास महाराज भोईर खांडस, भाऊ महाराज केलटकर मोठे वेणगाव, नथुराम महाराज हरपुढे कशेळे, राहुल महाराज शिंदे हाळीवली, योगिता थरकुटे सोलनपाडा, पदमा थोरवे नेरळ, कुमारी बोराडे हाळीवली, अदिती साळवे तुपगाव, रजनी मिसाळ निंबोड असे एकूण 151 हभप बुवा महाराजांना सन्मानित करण्यात आले.







