। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील श्री जोगेश्वरी माता क्रिडा मंडळ, आवास-राणे आळी यांच्या विद्यमाने स्व. प्रभाकर सदाशिव राणे व स्व.अर्चना प्रभाकर राणे स्मृती चषक 2021 या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी रिलायन्स नवगाव संघ भव्य ट्रॉफी व 55,555 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर या स्पर्धेत उपविजेता नागेश्वर आवास संघास ट्रॉफी व 33,333 रुपयांचे पारितोषिक, तृतीय क्रमांक जय हनुमान दिघोडी संघास ट्रॉफी व 11,111 रुपयांचे पारितोषिक व चतृर्थ क्रमांक जोगेश्वरी माता आवास संघास ट्रॉफी व 11,111 रुपयांचे पारितोषिक आवास ग्रामपंचायत सरपंच अभिजित राणे व उपस्थित मान्यवरांच्या हास्ते देण्यात आले. स्पर्धेस उत्कृष्ट फलंदाज विनोद वाटकरे नवगांव, उत्कृष्ट गोलदांज रणजीत रोगे आवास यांनी पटकविले तर मालिकावीर म्हणुन समीर पालकर यांनी पटकविले. सदर स्पर्धेस अलिबाग तालुक्याचे नामावंत 32 संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धा 4 दिवस खेळविण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पंचांची कामगिरी व समालोचन चांगल्या प्रकारे झाले. सामना भव्य अशा जोगेश्वरी माता मैदान येथे खेळविचण्यात आला. स्पर्धेतील अंतिम लढत नागेश्वर आवास विरुध्द रिलायन्स नवगाव यांच्यात अतीतटीची झाली. अंतीम लढतीच्या दोन्ही संघाच्या खेळाडुंचे अभिनंदन सरपंच अभिजित राणे आदि मान्यवरांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांकडून क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या खेळाडुंना दोन सायकलींची भेट देण्यात आली.