2000 प्रवाशांची शिपवरच अडवणूक
मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर किमान 2,000 प्रवाशांना आडकाठी करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास अधिकार्यांनी सांगितले आहे. ही शिप मुंबईहून निघाली होती. तर गोव्यातील मुरगाव क्रूझ टर्मिनलवर उतरली होती.
आरोग्य अधिकारी क्रूझवरील सर्व दोन हजार प्रवाशांची कोरोना चाचणी घेत आहेत. हे प्रवासी त्यांच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला.कोरोनाचा संसर्ग झालेल्या क्रू मेंबरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये संबंधित क्रू कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. अधिकार्यांनी सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास सांगितले आहे. या क्रूझ जहाजाच्या चालकांना वास्कोस्थित साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर या हॉस्पिटलमधून सर्व प्रवाशांच्या कोव्हिड-19 चाचण्या घेण्यास सांगण्यात आले आहे.