माणगाव | प्रतिनिधी |
येत्या 18 जानेवारी 2022 रोजी माणगाव नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत 4 जागांसाठी 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
माणगाव नगरपंचायतीत वार्ड क्र.6,वार्ड क्र.8,वार्ड क्र.14,वार्ड क्र.17 या चार वार्डातील निवडणुक येत्या 18 जानेवारीला होत असून या निवडणुकीसाठी वार्ड क्र.6 मधून हर्षदा सतीश सोंडकर,स्नेहा नितीन दसवते,वार्ड क्र.8 मधून नंदिनी नितीन बामगुडे,चेतना मंगेश निंबाळकर, वार्ड क्र.14 मधून मयूर दिलीप शेट, सचिन मारुती बोंबले,राजा गौरू भोनकर,वार्ड क्र.17 मधून दिनेश बाळकृष्ण रातवडकर,महामूद फकरुद्दीन धुंदवारे,रवींद्र भिकू मोरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत