। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात सोमवारी 35 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान समोर आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या संसर्गित रुग्णांची तालुक्यातील एकूण संख्या 21 हजार 115 झाली आहे. तर 18 जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
सोमवारी तालुक्यात आढळून आलेल्या 35 रुग्णांमध्य चेंढरे 8, अलिबाग शहर 7, नवखार 3, पोयनाड 2, धोकवडे 2, पेझारी 2, थळ 2, मांडवा, समर्थनगर, मापगाव, झिराड, नागाव, आगरसुरे, कुरुळ, भुते, सारळ प्रत्येकी एक असा समावेश आहे.
आतापर्यंत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 21 हजार 115 झाली आहे. 612 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 20 हजार 065 जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत 438 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.







