। सुतारवाडी । वार्ताहर ।
चिंचवली तर्फे दिवाळी येथील सुरेंद्र येरुणकर यांचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन झाले. सुरेंद्रच्या निधनाची बातमी समजताच असंख्य मित्र परिवार तसेच येरूणकर परिवार आणि ग्रामस्थांना त्याच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. सुरेंद्र एस टी मंडळात 1996 साली रुजू झाला होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे. दशक्रिया विधी गुरुवार 13 जानेवारी रोजी राहत्या घरी चिंचवली तर्फे दिवाळी येथे होणार असल्याचे येरूणकर परिवाराने सांगितले.







