| पनवेल | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेचे जि. प. सदस्य राजू पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून जलजीवन मिशन अंतर्गत मोहोपे येथे साकारणार्या 50 लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा आ.बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला.
मोहोपे येथील जल जीवन मिशन अंतर्गत जलकुंभ उभारने आणि बारवई पुल ते मोहापे पाईपलाईनचे भूमिपूजन समारंभ आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते पार पडले. पाणी पुरवठा योजनेचे 50 लाख रुपये आणि पाईपलाईन कामाची रक्कम जवळपास 13 लाख रुपये आहे. होळीमाळ मोहोपे येथे हे उद्घाटन पार पडले.
या कार्यक्रमाला माजी उपसरपंच भगीरथ पांडुरंग चोरघे, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष देवेंद्र पाटील, जगदीश मते सरपंच, भरत पवार सदस्य व सर्व सदस्य, कमलाकर भोईर माजी उपसरपंच, गजानन लक्ष्मण भोईर माजी सदस्य, संतोष पवार, भास्कर भोईर, लक्ष्मण भोईर, किसन भोईर, संजय पवार, गोपीनाथ पाटील, ज्ञानेश्वर भोईर, नरेंद्र भोईर, प्रवीण पवार, कमलाकर पवार, अशोक भोईर, श्रीकांत पवार, अविनाश मुंडे, प्रेमजित पवार, किशोर भोईर, अमोल पवार व सर्व ग्रामस्थ मोहोपे उपस्थित होते.