वन कर्मचार्यांच्या समस्या दूर करणार
ना.आदिती तटकरे व मा.आ.विजय गव्हाण यांचे आश्वासन
। खांब-रोहा । वार्ताहर ।
वन कर्मचार्यांच्या टाइम बाँण्ड समस्याचा अन्याय दूर करणार असल्याचे आश्वासन रा.जि.पालकमंत्री ना.आदिती तटकरे व परभणी मा.आ.विजय गव्हाण यांनी वन कर्मचार्यांच्या सभेत कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सेवानिवृत्त वनपाल शंकर धनावडे यांनी महाराष्ट्राचे वनपाल संदर्भात कर्मचार्यांवर 20 वर्षे करबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगत योजना, व 10.20 व 30 लाभ देणे, अतिप्रगत रक्कमा कर्मचार्यांना परत करणे, पेन्शनमधून लसूल होणार्या अतिप्रदान रक्कमा थांबविणे याबाबत विचारविनिमय सभा 1 मे 2022 रोजी पनवेल येथे क्षणभर विश्रांती येथील सभागृहात संपन्न करण्यात आली आहे. विशेषतः पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात झालेल्या सभेमध्ये सन 1976 च्या सेवा शर्तप्रमाणे रूजू झालेल्या कर्मचार्यांना सन 1987 ते 1998 चे अधिसुचनेचे निकष कर्मचार्यांना सेवा प्राप्तीच्या उंबरठ्यावर असताना लावतात कसे या पालकमंत्र्यांच्या आदेशाचा उल्लेख केला व वरिष्ठ पदावर काम करणार्या कर्मचार्यांना कमी वेतन व पेन्शन तर कनिष्ठ कर्मचार्यांना ज्यादा वेतन व पेन्शन हा अन्याय लवकरात लवकर दूर करावा असे वनराज्यमंत्री भरणे यांच्या आदेशाचा देखील त्यांनी उल्लेख केला व स्वतः कर्मचार्यांच्या पाठिशी उभे राहून कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांवर होणार्या अन्यायाचा लवकरच लवकर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचारी वर्गानी समाधान व्यक्त केले आहे.
या सभेस खारकर, म्हात्रे, माने, जांभळे, गोवंड, अंबाजी, कडवे, राठोड, जगताप, संखे, पाटील, बेहेरे, पवार, कड, ढसाळ, भोंडे, पगारे, झोमण, गुरखा, बोंडाळकर पवार आदी रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सावंतवाडी, पूणे, नाशिक, मालेगाव आदी ठिकाणचे वन अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक बि.के.गोरनाख यांनी केले तर सुत्रसंचलन शंकर धनावडे यांनी करून निकिते यांनी अनुमोदन दिले.