। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरान मधील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथे घोड्यांचे व कुत्र्यांचे रेबीज लसीकरण व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या शिबिरास अश्वचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक डॉ.अजित रानडे तसेच पशुवैद्यकीय संवर्धन मुंबई विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पशु कल्याण पंधरवड्यानिमित प्राध्यापक, तज्ञ डॉ.जी.एस.खांडेकर, डॉ.एस.एच.दळवी, डॉ.म.न.सावंत, डॉ.एस.टी.हांडे, डॉ.आर.आर.फरांदे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्याम कदम, कळंब येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.वैशाली पाटील, माथेरान मधील पशु धन विकास अधिकारी अमोल कांबळे, पशुधन विस्तार अधिकारी मिलिंद जाधव, प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसाट्याटीचे निलेश भणगे यांनी येथील घोड्यांचे व श्वानांचे रेबीज लसीकरण करून घेतले. माथेरान पशुवैद्यकिय दवाखान्याचे पशुधन अधिकारी डॉ.अमोल कांबळे यांनी दोन्ही संस्थांचे स्वागत केले तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिचारक राम तितकारे यांनी विशेष मेहनत घेतली.