| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील कोरोनाची लढाई लढण्याकरिता कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा खारीचा वाटा आहे. या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरिता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था यांच्या एक्स्पर्ट पॅनेलने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. ही शिफारस मान्य झाली तर या दोन्ही लस विक्रीसाठी लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींनी कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही कंपनीने लसच्या खुल्या बाजारातील विक्रीसाठी मान्यता मिळावी म्हणून अर्ज केले आहेत. या संदर्भात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या विषय तज्ज्ञ समितीने याबाबत पाठपुरावा केला आणि त्यानंतर या दोन्ही लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध कराव्यात, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या शिफारसीवर केंद्र सरकार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.