। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी आंबोली मार्गावर भरधाव वेगाने जाणार्या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या बाहेर फेकला गेला. या अपघातात संतोष पाटील ( 30, रा.आंबोली) हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले होत पंचनामा केला. या अपघातातील कारचालक हा वेंगुर्ला येथून आंबोलीच्या दिशेने जात होता. तर दुचाकीस्वार हा कामानिमित्त आंबोली येथून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. कारिवडे पेडवेवाडी समर्थ धाबा परिसरातील वळणावर त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तर दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तसेच चारचाकीच्या दर्शनी भागाचे देखील मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चारचाकी चालकाला चा स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करत रोखत जाब विचारला. त्यानंतर स्थानिक आणि जखमीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला.