| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मराठी चित्रपटाचे सुपर स्टार रितेश देशमुख यांच्या वेड या मराठी चित्रपटाचे शूटिंग अलिबाग समुद्र किनारी सुरू करण्यात आले आहे. रितेश देशमुख स्वतः या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची पत्नी जेनोलिया देशमुख या त्यांच्या सोबत काम करीत आहेत
बॉलिवूड इंडस्ट्री मधुन नावारूपाला आलेले रितेश विलासराव देशमुख यांना आता दिग्दर्शक होण्याचं “वेड” लागलं आहे कारण ते स्वतः पडद्यामागून वेड चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आपल्या फेसबुक पेजवर आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी त्यांनी दिली आहे, साधारण 20 वर्षांपूर्वी 2001 ला पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर आलो.
“लोकांना वाटलं हे वेड आहे पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो तोच वेडेपणा आज पुन्हा दिग्दर्शक या रुपात मी करत आहे” आपले प्रेम आणि आशीर्वाद राहु द्या म्हणत रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित “वेड” या चित्रपटाची अधिकृत घोषणा त्यांनी केली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहेत तर म्युझिक अजय-अतुल यांचे असणार आहे त्यामुळे हा चित्रपट नक्कीच सुपर डुपर हिट राहील असे चाहत्यांना वाटत आहे.