। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजीटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजीटल करन्सी जारी करणार आहे. यासंदर्भातील घोषणा अर्थशंकल्पामध्ये करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्येच ही करन्सी जारी केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना डिजीटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केले जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल. डिजीटल रुपी हे आभासी चलन ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरबीआयकडून 2022-23 दरम्यान जारी केले जाणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.