नियमित जामीनही नामंजूर; पोलिसांसमवेत बाचाबाची
| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं भाजप आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला आहे.त्यावरुन आता राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मात्र,यावरुन राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. न्यायालयातून बाहेर पडत असतानाच नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली.न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्यासमोर आपल्या गाड्या लावल्या आहेत. यामुळे माजी खासदार निलेश राणे आक्रमक होत थांबविण्याचे आदेश दाखवा, अशी त्यांनी मागणी केली आहे. कुठल्या अधिकाराखाली थांबवलं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यापूर्वी नितेश राणेंना अटक करता येणार नाही, असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.