• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निशब्द…! स्वरकोकिळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास

Madhavi Sawant by Madhavi Sawant
February 6, 2022
in sliderhome, कोंकण, देश, राज्यातून, रायगड, विदेश
0 0
0
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई । प्रतिनिधी ।

अनेक शतकं आपल्या आवाजामुळे रसिकमनावर राज्य करणार्‍या लताजी भारताच्या सर्वात प्रसिध्द आणि उत्तम व सन्माननिय पाश्वगायिका आणि संगितकार म्हणुन सुपरिचीत आहेत.
स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्‍वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. जोवर चंद्र सुर्याचं अस्तित्व या भुतलावर आहे तोवर लता मंगेशकरांच्या आवाजाचे गारूड प्रत्येक कानसेनावर कायम राहाणार आहे. कारण त्यांच्या आवाजाने उंचीचे जे किर्तीमान गाठले आहे तिथपर्यंत पुढच्या काळात बहुतेकच कुणी पोहोचु शकेल.

लता मंगेशकरांच्या आवाजावर संशोधन देखील करण्यात आले.
1942 साली वयाच्या अवघ्या 13 व्या वर्शीपासुन भारतिय सिनेमा जगताला त्या आपला आवाज देत आहेत. आपल्या सबंध कारकिर्दीत आजतागायत लतादिदींनी 1000 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये व जवळजवळ 36 पेक्षा जास्त प्रादेशिक भाशामंध्ये गाणी गायली आहेत. या सोबतच लतादिदींनी अनेक विदेशी भाषांमध्ये देखील गायन केले आहे. संगीताच्या या महानायिकेने सर्वात जास्त गाणी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये गायिली आहेत.

लताजी सर्वाधिक गाणि रेकॉर्ड करणार्‍या म्युझीक आर्टिस्ट म्हणुन देखील ओळखल्या जातात. एका कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी लताजींनी ङ्गङ्घए मेरे वतन के लोगों जरा आँख मे भरलो पानी ङ्गङ्घ गायिले त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळयात अश्रु तरळले होते. लता मंगेशकर यांच्या व्दारे संगीत क्षेत्रात दिल्या गेलेल्या अभुतपुर्व योगदाना करीता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

1989 साली भारत सरकारव्दारे लतादिदींचा भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. लता मंगेशकर एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर दुसर्‍या अश्या गायिका आहेत ज्यांचा भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला.

अनेक चढउतारांचा सामना करत लताजी अनेक संघर्षांना आजवर सामोर्‍या गेल्या. परंतु त्यांनी कधीही हार मानिली नाही. निरंतर आपल्या ध्येयाला प्राप्त करण्याकरता पुढे जात राहिल्या.जीवनात मिळणार्‍या सन्मानाचा आदरपुर्वक स्विकार केला.   

पुर्ण नाव – लता दिनानाथ मंगेशकर
जन्म – 28 सप्टेंबर 1939 इन्दौर
वडिलांचे नाव – पंडित दिनानाथ मंगेशकर
आईचे नाव – शेवंती मंगेशकर
बहिणी – आशा भोंसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर
भाऊ – हृदयनाथ मंगेशकर

लता मंगेशकर यांचा जन्म, परिवार आणि प्रारंभिक जीवन –
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्यप्रदेशातील इंदौर येथे एका गोमंतक ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि थिएटर कलावंत होते. त्यामुळे लतादिदींना संगिताचे बाळकडु कुटुंबातुनच मिळाले होते.

लताजींच्या आईचे नाव शेवंती (शुधामती) होते व त्या महाराश्ट्रातील थालनेर येथील होत्या आणि पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या त्या दुसर्‍या पत्नी होत. सुर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मुळ आडनाव हर्डीकर असे आहे. परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलुन आपल्या मुळ गावावरून ते मंगेशकर असे केले. त्याचे कारण म्हणजे आपल्या नावाने आपल्या गावाचे मंगेशी, गोव्याचं प्रतिनीधीत्व करावं, अशी त्यांची धारणा होती. पुढे लतादिदींच्या जन्मानंतर काही काळातच हा पुर्ण परिवार महाराश्ट्रात स्थानांतरीत झाला.

लताजींना लहानपणी मा या नावाने हाक मारली जात असे. परंतु पुढे त्यांच्या वडिलांनी एका भावबंधन या नाटकामुळे प्रभावित होउन त्यांचे नाव बदलुन लता असे केले. आणि त्यानंतर संगिताच्या क्षेत्रात लता नावाने एक किर्तीमान स्थापीत केला हे तर आपण सगळे जाणतोच. लता या आपल्या आई वडिलांच्या सर्वात मोठया आणि पहिल्या अपत्य होत. त्यांची एकुण चार लहान बहिण भावंड आहेत. मीना, आशा भोसले, उषा आणि हृदयनाथ. बालपणापासुनच संगीताची आवड असल्याने सुरांची जादुगार लताजींनी गाण्याचे सुरूवातीचे धडे आपल्या वडिलांसमवेत गिरवीले होते. आपल्या वडिलांकडुन आपल्या भावंडांसमवेत त्या शास्त्रीय संगीत शिकत असत. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षांपासुन त्या आपल्या वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये अभिनय करत असत. लता हा संगीत क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार आहे. याची जाणीव त्यांच्या वडिलांना तिच्या लहानपणीच झाली होती.
वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी या स्वरसम्राज्ञीने शास्त्रीय संगिताची मैफिल सजविली होती. लहानपणापासुन संगीतात आवड असल्याने लताजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत खान, बडे़ गुलाम अली खान, पंडित तुलसीदास शर्मा व अमानत खान देवसल्ले यांच्याकडुन घेतले होते. त्या वेळी लताजी के.एल. सहगल यांच्या संगीताने फार प्रभावित होत्या.

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जवाबदारी त्यांनी आपल्या खांदयावर घेतली. संगीतातील चमत्कार मानल्या जाणार्‍या लता मंगेशकर यांच्यावर त्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यासुमारास लता केवळ 13 वर्षांच्या होत्या. कुटुंबात त्याच मोठया असल्याने आपल्या बहिण भावंडांची जवाबदारी त्यांच्यावर आली. परिणामी लताजींनी बालवयातच आपल्या परिवाराच्या पालनपोषणाकरीता काम करणे सुरू केले.

लता मंगेशकर यांची कारकिर्द
वयाच्या 13 व्या वर्षी लतादिदींनी आपल्या करियरला सुरूवात केली आणि तेव्हांपासुन आजतागायत आपला सुमधूर आवाज त्या भारतीय सिनेमाला देत आल्या. लतादिदींनी पहिले गाणे 1942 साली मराठी चित्रपट किती हसाल, करीता नाचु या ना गडे खेळु सारी मनी हौस भारी, गायिले होते. या गीताला सदाशिवराव नेवरेकर यांनी संगितबध्द केले होते. परंतु या चित्रपटाच्या एडिटींग दरम्यान या गीताला चित्रपटातुन काढुन टाकण्यात आले.
पुढे नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि लतादिदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी दिनानाथ मंगेशकरांच्या मृत्युपश्‍चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यास आणि लता मंगेशकरांना एक गायिका आणि अभिनेत्री बनवण्यात मदत केली. मास्टर विनायक यांनी लतादिदिंना 1942 साली मराठी चित्रपट पहिली मंगळागौर या चित्रपटात एक छोटीशी भुमिका देखील दिली होती. ज्यात लताजींनी एक गीत देखील गायिले होते. जरी दिदिंनी आपली कारकिर्द मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणुन सुरू केली असली तरी त्या काळी असे कुणालाही वाटले नाही की ही लहान मुलगी पुढे एक दिवस हिंदी सिनेसृष्टीत एक प्रसिध्द आणि सुमधुर गायिका होणार आहे.

तसे पाहाता त्यांचे पहिले हिंदी गीत देखील 1943 ला आलेल्या मराठी चित्रपटातीलच होते. ते गीत माता एक सपुत की दुनियां बदल दे तू, असे होते आणि चित्रपटाचे नाव होते गजाभाऊ. पुढे लताजी 1945 साली मास्टर विनायक कंपनी सोबत मुंबईला गेल्या आणि येथुनच त्यांनी आपली संगीत प्रतिभा आणखीन उज्वल होण्याकरीता उस्ताद अमानत अली खान यांच्याकडुन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरविण्यास सुरूवात केली.

या दरम्यान त्यांना अनेक संगीतकारांनी तिच्या आवाजाची पातळ आणि कर्कशः अशी अवहेलना करीत रिजेक्ट केले. कारण तिचा आवाज त्या दरम्यान पसंत केल्या जाणार्‍या आवाजांपेक्षा अगदी भिन्न होता आणि त्याच सुमारास त्याकाळच्या प्रसिध्द गायिका नुरजहांकरीता देखील गाण्यास सांगितले जात होते. 1948 ला मास्टर विनायक यांच्या मृत्युमुळे लताजींचा आणखी एक आधारवड कोसळला आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्या एकाकी पडल्या. यामुळेच त्यांची सुरूवातीची वर्षे अत्यंत संघर्षपुर्ण राहीली. मास्टर विनायक यांच्या मृत्युपश्‍चात गुलाम हैदर यांनी लताला तिच्या कारकिर्दीत बरीच मदत केली.

1948 साली मजदुर चित्रपटातील दिल मेरा तोडा मुझे कहीं का ना छोडा, गीताने लता मंगेशकरांना ओळख मिळाली. यानंतर लगेच 1949 ला आलेल्या महलसाठी त्यांनी आपले पहिले सुपरहिट गीत आयेगा आयेगा, आयेगा आनेवाला हे गायिले. या गीतानंतर त्यांना मोठमोठया संगितकारांच्या नजरेत ओळख मिळाली. 1950 साली लता मंगेशकरांना अनेक मोठे संगीतकार जसे अनिल विश्‍वास, शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, खय्याम, सलिल चैधरी, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली.
लताजींच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल असा काळ तेव्हां आला, ज्यावेळी संगीतकार सलिल चौधरी यांच्या मधुमती चित्रपटातील गीत आजा रे परदेसी करीता सर्वोत्कृष्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा पहिला फिल्म फेयर अवॉर्ड त्यांना मिळाला.

या दरम्यान गानकोकीळा लता मंगेशकरांनी काही रागांवर आधारीत गीतं जसे बैजु बावरा करीता भैरव रागातील मोहे भूल गए सावरियां काही भजनं जसे हम दोनो चित्रपटातील अल्लाह तेरो नाम सोबतच काही पश्‍चिीमी चालींवरची जसे अजिब दास्तां गायिली होती.
याच सुमारास आपल्या जादुई आवाजाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजविणार्‍या लता दिदींनी मराठी आणि तमिल सोबतच प्रादेशिक भाषांमध्ये गीत गायनाला सुरूवात केली होती. या नंतर लतादिदींनी आपल्या लहान भावासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्याकरीता गीत गायले. तो मराठी भाषेतील जैत रे जैत हा चित्रपट होता. या व्यतीरीक्त त्यांनी बंगाली भाषेतील संगीताला आपल्या मधुर आवाजाने एक वेगळी ओळख मिळवुन दिली. 1967 साली लताजींनी क्रांतिवीरा सांगोली चित्रपटात लक्ष्मण वेर्लेकर यांच्याव्दारे संगीतबध्द केलेले गीत बेल्लाने बेलागयिथू गात कन्नड भाषेत गायनाला सुरूवात केली.
यानंतर लताजींनी मल्याळम भाशेत नेल्लू चित्रपटाकरता सलिल चौधरी यांनी संगीतबध्द केलेले कदली चेंकाडाली गायिले. नंतर कित्येक वेगवेगळया भाषांमध्ये गायन करून त्यांनी आपल्या आवाजाने संगीताला एक नवी ओळख मिळवुन दिली.

या दरम्यान लता मंगेशकरांनी अनेक दिग्गज संगीतकारांसमवेत जसे हेमंत कुमार, महेन्द्र कपुर, मोहम्मद रफी, मन्ना डे, सोबत मोठमोठे प्रोजेक्ट्स केलेत. या दरम्यान लताजींची कारकिर्द अत्युच्च शिखरावर होती, त्यांच्या सुमधुर आणि सुरेल आवाजामुळे त्या सिंगींग स्टार झाल्या होत्या, हा तो काळ होता जेव्हां मोठयातला मोठा निर्माता, संगीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक लता मंगेशकरांसमवेत काम करू इच्छित होता.

1960 चा काळ लताजींकरता यशाने भारलेला होता. या सुमारास त्यांनी प्यार किया तो डरना क्या, अजिब दास्तां है ये सारखी अनेक सुपरहिट गाणी गायिली. लता दिदींच्या आवाजाची जादु 1970 आणि 1980 च्या दशकांवर देखील कायम राहीली. या काळातील त्यांचे किशोर कुमार यांच्या समवेत गायिलेली ड्यूएट फार लोकप्रिय ठरली. काही गितं जसे कोरा कागज (1969), आंधी चित्रपटातील तेरे बिना जिंदगी से (1971), अभिमान चित्रपटातील तेरे मेरे मिलन की (1973), घर चित्रपटाकरीता आप की आंखों मे कुछ (1978) ही ती गाणी आहेत, ज्यांना आजही ऐकल्यानंतर मनाला प्रसन्नता मिळते.
1980 साली महानगायिका लताजींनी सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव राहुल देव बर्मन अर्थात आर.डी. बर्मन यांच्यासोबत काम केले. आर.डी.बर्मन लता मंगेशकर यांची लहान बहिण आणि हिंदी मराठी चित्रपटातील प्रसिध्द पार्श्‍वगायिका आशा भोसलें यांचे पती आहेत. त्यांनी लताजीं समवेत अगर तुम ना होते चित्रपटातील हमें और जीने की, रॉकी मधील क्यां यही प्यार है, मासुममधील तुझसे नाराज नहीं जिंदगी अशी सुप्रसिध्द गाणी बनवली. यानंतरच्या काही वर्षांनंतर लताजींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी काही निवडक गाण्यांनाच आवाज देण्यास सुरूवात केली. 1990 च्या दशकात अनेक नव्या गायिका उदयाला आल्या. या काळात देखील लतादिदींच्या आवाजाची जादु कायम राहिली आणि आज देखील लोक तितकेच प्रेम लतांजींवर करतात, जितके 70, 80, आणि 90 च्या दशकात करत होते.

लता मंगेशकरांनी गायिलेल्या अविस्मरणीय गाण्यांमधील काही चित्रपट प्रसिध्द आणि विशष उल्लेखनीय आहेत अनारकली, मुघल-ए- आझम, अमरप्रेम, गाईड, आशा, प्रेमरोग, सत्यम शिवम् सुंदर.
एक काळ होता जेव्हां बरसात, नागिन आणि पाकिजा चित्रपटातील गाणी अजरामर झाली. लतादिदींनी 30,000 हुन अधिक गाणी गायिली आहेत.

लता मंगेशकर पुरस्कार
आपल्या कारकीर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय मानसन्मान प्राप्त झाले. यामध्ये भारताचा सर्वोच्च पद्मश्री आणि भारतरत्नचा देखील समावेश आहे. या व्यतीरीक्त लताजींना गायनासाठी 1958, 1960, 1965, आणि 1969 ला फिल्म फेयर अवॉर्ड प्राप्त झाले आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे देखील त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकार तर्फे त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी 1 लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1989 ला लतादिदींना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

लता मंगेशकर यांना आजवर मिळालेले पुरस्कार असे आहेत
फिल्म फेयर अवॉर्ड पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993, आणि 1994)
नॅशनल फिल्म अवॉर्ड (1972, 1974 आणि 1990 )
महाराष्ट्र सरकार पुरस्कार (1966 आणि 1967)
पद्मभूषण (1969)
गिनीज बुक रेकॉर्ड (1974)
दादासाहेब फाळके पुरस्कार (1989)
फिल्मफेयर लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड (1993)
स्क्रीन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड (1996)
राजीव गांधी पुरस्कार (1997)
एन.टी.आर.पुरस्कार (1999)
पद्मविभूषण (1999)
झी सिने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार (1999)
आई.आई.ए.एफ. लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार (2000)
स्टारडस्ट लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार (2001)
भारतरत्न पुरस्कार (2001)
नुरजहा पुरस्कार (2001)
महाराष्ट्र भूषण (2001)
लता मंगेशकर यांना भारताच्या 60 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी 2008 साली वन टाईम अवॉर्ड फॉर लाईफटाईम अचीव्हमेंटने गौरविण्यात आले.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #death # Bollywoodlata mangeshkarmaharashtramarathi news paper
Previous Post

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

Next Post

गानसम्राज्ञी लता मंगेशकर: दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

माथेरान- नेरळ घाटरस्त्यातील गटारांचे साफसफाईचे काम सुरु
कर्जत

माथेरान- नेरळ घाटरस्त्यातील गटारांचे साफसफाईचे काम सुरु

May 12, 2026
नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर
sliderhome

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर

May 12, 2026
रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

दारूच्या बाटल्या, रोख रकमेची चोरी

May 11, 2026
Next Post
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर: दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?