11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 28 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 12 नव्या रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने उपचारादरम्यान आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 11 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 8, पनवेल ग्रामीण 1, पेण 1, अलिबाग 1 व महाड 1 असे 12 रुग्ण आढळले. उरण, खालापूर, कर्जत, मुरुड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा व पोलादपूर या 11 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 516 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 558 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 692 वर गेला आहे. सद्यस्थितीत 266 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.