| अलिबाग | विशेष प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अनिकेत वाजेकर याला विशेष न्यायाधीश १ शहीदा शेख यांनी दिनांक आज महत्वपूर्ण निकाल देत १० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदरचा गुन्हा हा दि. ०१ ऑक्टोबर २०१८ ते सन २०२१ नागाव, ता. अलिबाग व मौजे शिरढोण ता. पनवेल, जि. रायगड तसेच विरार, ता. वसई, जि. पालघर येथे घडला आहे. या प्रकरणातील आरोपी अनिकेत वाजेकर याने या प्रकरणातील पिडीता हीच्याशी फोनवरील इन्स्टाग्रामवर मैत्री करून सुरुवातीला तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फोनवरून तिच्याशी संवाद सादत आरोपीने पिडीतला तिच्या अज्ञानीपणाचा फायदा घेवून तसेच ती बौद्ध समाजाची आहे हे माहित असून तिला लग्न करण्याची फुस लावून आरोपीने पिडीतेला नागाव येथील बीचवर यानंतर तिला तिच्या मर्जीशिवाय तसेच तिच्या आईवडीलांच्या कायदेशीर रखवालीतून मौजे शिरढोण, ता. पनवेल येथे व यानंतर मी विरार येथे पिडीतेच्या रुमवर शारिरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केले. या प्रकरणात मुलीचे वय १७ वर्षांचे आहे हे माहित असून सुध्दा तिला आरोपीने पळवून नेले होते हे न्यायालयासमोर सिध्द झाले आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपी अनिकेत यास दोषी पकडून, १० वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये २५,०००/- दंड, व दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.