पंडित पाटिल यांनी घेतली भेट व केली विचारपुस | पाली/बेणसे | धम्मशील सावंत | रशिया व युक्रेन या देशात मोठे घनघोर युद्ध पेटले आहे. अशात भारत देशातील शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी या देशात अडकले आहेत. युक्रेन येथील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेली रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेझारी येथील रहिवाशी पूर्वा पराग पाटील ही आपल्या घरी कुटूंबात सुखरूप पोहचली. त्यामुळे पूर्वा आणि तिच्या कुटूंबाने आनंदोत्सव साजरा केला. पूर्वा पुन्हा घरी आल्याने सारे कुटूंब आनंदित झाले. मोठ्या आनंदात पूर्वाचे जंगी स्वागत पाटील कुटूंबाने केले. यावेळी माजी आमदार पंडित पाटिल यानी पूर्वा व कुटुंबियांची भेट घेतली व विचारपुस केली. व पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या.
पूर्वा हिने या युद्धजन्य परिस्थिती कसे दिवस काढले आणि कशी पोहचली याचा अनुभव सांगितला.रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. परंतू हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान रशियाने युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये मिसाईल हल्ला केला या हल्ल्यात कर्नाटक येथील नवीन शेखर्प्पा ज्ञानगोदर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आपली मुले घरी यावीत यासाठी पालक प्रयत्न करीत होते. अलिबाग तालुक्यातील कन्या पूर्वा पराग पाटील ही घरी आल्याने पालक आनंदित झाले.
पूर्वाचे अभिनंदन करताना माजी आमदार पंडित पाटील.(छाया: धम्मशील सावंत)







