। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार तीर्थस्वरुप, महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतेच युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पॅरिस यांच्या वतीने ‘लिव्हिंग लेजंड’ या पदाने गौरविण्यात आले. तसेच, रायगडभूषण डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी रेवदंडा येथील निवासस्थानी भेट देवून पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच त्यांचे सुपूत्र डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद भावना पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते.