जन्मदात्या आईनेच हत्या केल्याचा सासूचा आरोप
। दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीत सव्वा महिन्यांच्या बाळाची हत्या झाल्याची अतिशय घृणास्पद घटना घडली आहे. या बाळाचा मृतदेह ओव्हनमध्ये आढळल्याचे समोर आले आहे.केवळ एक महिना वीस दिवसांच्या मुलीचा मृतदेह ओव्हनमध्ये आढळला. या बाळाचा मृतदेह कापडात गुंडाळलेलय अवस्थेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा चेहरा निळा पडला होता व तिच्या तोंडातून रक्त येत होते. तर, चिमुकलीची आई डिम्पल कौशिक हिनेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत बाळाच्या आजीनेच आपल्या सुनेवर खुनाचा आरोप केला आहे.
सध्या पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मुलीच्या आई आणि वडिलांची चौकशी सुरु आहे.
कसा सापडला मृतदेह?
मुलीचा शोध घेण्यासाठी खोलीच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या, मात्र त्या खोलीतही मुलगी सापडत नव्हती. यानंतर बाळ घरात कुठेच न सापडल्याने वॉशिंग मशिनमध्येही तिचा शोध घेतला गेला. तेवढ्यात ओव्हनकडे लक्ष जातच तो ओव्हन वजनाने जड लागत होता. तो उघडून पाहिला असता मुलीचा मृतदेह कापडात गुंडाळलेला आढळला. त्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.







