। पाली/बेणसे । वार्ताहर ।
बौद्ध समाज युवा संघ रायगड व महिला परिवार यांच्या संयुक्तविद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय निवासी आश्रमशाळा माणगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी बौद्ध समाज युवा संघाच्या सचिव रोहिणी जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमासाठी केंद्रीय निवासी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सरस्वती कांबळे, उर्मिला कांबळे, रमेश शिंदे, रवींद्र गायकवाड, जगदीश मोरे, अमोल वाटवे, सुरेंद्र शेलार, अनंत दाभणे स्वप्नाली कांबळे, मंदा शिंदे, संध्या जाधव, योजना रणावरे, वैशाली जाधव, सुविधा अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.







