तेलंगे फायटर संघाला उपविजेतेपद
। माथेरान । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील भेलोशी ग्रामस्थ मुंबई मंडळ सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळाकडून संलग्न सोमजाई क्रिकेट क्लब भेलोशी यांच्या विद्यमाने भेलोशी चषक 2022 चे भेलोशी हायस्कूल मैदानावर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात एन्जॉय अंबावली संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले.
खाडीपट्टा टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणीकृत झालेल्या 24 नामवंत संघांनी या क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला होता. यामध्ये विजेता संघ एन्जॉय अंबावली संघ ,उपविजेता तेलंगे फायटर,तृतीय क्रमांक सोमजाई क्रिकेट संघ भेलोशी यांनी भेलोशी 2022 या चषकावर नाव कोरले, तसेच तेलंगे फायटर संघाचा अनिकेत चव्हाण यांनी उत्कृष्ट फलंदाज तर एन्जॉय आंबवली संघाचा राहुल चोरगे यांनी उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला तर मालिकवीर सोमजाई भेलोशी संघाचा संकेत यादव यांनी किताब पटकावला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष धारशे, उपाध्यक्ष हिरोचंद्र पिचुर्ले, सरचिटणीस जयेश यादव, चिटणीस सखाराम रेवाळे, खजिनदार संदेश रेवाले, हिशोब तपासनीस मंगेश निर्मल आणि सल्लागार सत्यवान यादव, समीर रेवाळे सोमजाई क्रिकेट क्लब भेलोशी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांचे विशेष योगदान होते.







