| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ताडवाडी मुरुड येथील युवा शिवसैनिकांनी शिवसेनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच तरुण लोकांच्या अपमानाला कंटाळून शेकापक्षात प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे शेकापक्षत स्वागत केले. यावेळी शेकापक्षाचे मुरुड तालुक्यातील नेते वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष शरद चवरकर आदी उपस्थित होते.






