। पाली । वार्ताहर ।
विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाच्या नामाचा गजर श्री बल्लाळेश्वराच्या पाली शहरात दरवर्षीप्रमाणे वैशाख शुक्र दिनांक 4 ते 11 मे रोजी पर्यंत दुमदुमणार असून सुधागड तालुका श्री संतमेळा किर्तन सप्ताह मंडळ यांच्यावतीने सलग आठ दिवस कीर्तन प्रवचनातून समाज प्रबोधन करून हरिनामाची गोडी नागरिकांना लागावी व हरिनामाची गोडी असणार्यांना नागरिकांना सुश्राव्य व बोधरूपी कीर्तन प्रवचनाचे श्रवण व्हावे म्हणून पालीतील श्री बापूजी मंदिर आगरआळी स्टेट बँक समोर श्री संतमेळा कीर्तन सप्ताह, अखंड हरिनाम यज्ञ तथा सद्भावना दिन व दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन वसंत दंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी माजी आ. धैर्यशील पाटील, आ. अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.







