। महाड । प्रतिनिधी ।
महाडमध्ये मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करणार्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला. बुधवारी सकाळपासून सुरक्षेच्या कारणास्तव महाडमधील मनसे कार्यालयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावेळी मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.