मनसेने मानले मुस्लिमांचे आभार
। पनवेल । वार्ताहर ।
मनसेच्या इशार्याची दखल घेत पनवेलमध्ये बुधवारी 4 मे रोजी पनवेलमध्ये भोंग्याशिवाय अजानाची बांग देण्यात आली.त्याबद्दल मनसेने मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त केले आहे. मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एक व्हिडीओ जारी करुन सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. पनवेलमध्ये पहाटे 4 वाजून 50 मिनिटांची आणि 6 वाजून 8 मिनिटांची अजान भोंग्यावरुन न होता फक्त तोंडाने बोलून झाली, असं चिले यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या आवाहनाला पनवेलमधील मुस्लीम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेकडून मुस्लीम बंधवांचे आभार देखील चिले यांनी व्यक्त केले आहेत. या पुढेही अशीच अजान भोंग्यांवर न देता तोंडी द्यावी, असंही चिले यांनी म्हटलं आहे. तसेच जर या पुढे भोंग्यांवर अजान दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यावरच ऐकावी लागेल, असा इशारा देखील मनसेकडून देण्यात आला आहे.