। कोलाड । प्रतिनिधी ।
गोवे येथील गीता द.तटकरे तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट चे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. मॅकेनिक विभागामार्फत कॉलेज च्या विद्यार्थीसाठी इंटव्हूटेक्निक व सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट हा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल वाढवणे व पुढील भविष्यासाठी तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कर्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंग्लिश स्पोकन क्लासचे फॉडर निलेश देशमुख, रजिस्ट्रार अजित तेलंगे, तंत्रनिकेतनचे प्रा.विपुल मसाल, मॅकेनिक शाखा प्रमुख रुपेश पवार सहशिक्षक कर्मचारी पंकज मोहिरे, करण भोजने, मनीष पाटील, प्रथमेश कासार व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात इंटव्हू कशा दिला पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात आले.