। अलिबाग । वार्ताहर ।
गेल्या बरेच दिवसांपासून चोंढी ते कार्लेखिंड या मार्गावरील चाबूक हल्ला प्रकरणाने चांगलीच खळबळ माजवली आहे. या हल्ला प्रकरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संध्याकाळी ७ नंतर लोक घरातून बाहेर पडायला घाबरयला लागले आहे. त्यामुळे, चोंढी ते कार्लेखिंडीमधील या रस्त्यावरील परिसरात गस्तीपथक तयार केले आहे. अलिबाग आणि मांडवा पोलिसही रात्रीची गस्त ठेवणार असून मापगाव ग्रामसमिती मार्फतही गस्त सुरू आहे.
पोलिसांचे गस्तीपथक या मार्गावर सतर्क राहणार असून लवकरच मारेकऱ्यांना पकडण्यात यश येईल.
शैलेश सणस, पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे