। रसायनी । वार्ताहर ।
बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई, डायोसिस खान्देश मिशन प्रांतात तीन दिवसीय संजीवन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हीज ग्रेस मार्टिन मोर एप्रेम एपीस्कोपा हे महाराष्ट्रात बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चचे पहिले बिशप आहेत. त्यानी आजारी लोकांसाठी प्रार्थना करून आशीर्वाद दिले तसेच तरुणांना ड्रग्ज, दारू इत्यादींच्या गुलामगिरीतून बाहेर पडून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला. खान्देश मिशन प्रांतातील लोकांनी बिशपांचे स्वागत त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक पोशाखात आणि सुरेल गाण्यावर नृत्य करून केले. बिशपकडून शिकण्याची ही धन्य वेळ होती. देवाच्या कृपेने 1500 हून अधिक लोक आशीर्वादीत झाल्याने त्यांनी धन्य मानले. यावेळी ग्रेस मार्टिन मोर ऍप्रेम एपिस्कोपा आणि रेव्ह. फादर बेनी इपेन डायोसिसेन सेक्रेटरी, रेव्ह फादर आनंद वर्मा,फादर योहान गावित असोसिएट विकार, तिलोतमा हरपाल, रमेश राऊत, शैलेश नाईक, पोर्तु नाईक, लकमा कुंवर, मगन वळवी, गगाराम वसावे,महेंद्र वळवी, डिकन फादर, इव्हँजेलिस्ट आणि पाळकजण सभेत उपस्थित होते.