। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील रॉयल सर्व्हिसेस डीत्सुबिटर, गोपिका हॉटेलच्या बाजूला तालुक्यातील कोन गावामध्ये उभी करून ठेवलेली महिंद्रा पिकअप गाडीची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे. एलियाहु सिमशोन दिघोडकर ( वय 60 ) यांनी त्यांची 60. 000 % रुपये किमतीची पांढर्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम एच 14 ए झेड 2355 हि गाडी सदर ठिकाणी उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने या बाबतचीतक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.