। माणगाव । वार्ताहर ।
मात्र पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांनी विचार विनिमय करून रविवार दि.22 मे रोजी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर यांतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील आरोपी रवी पाटोळे (पूर्ण नाव माहीत नाही ) रा.उल्हासनगर जि. ठाणे याने यांतील फिर्यादी रा.निजामपूर ता. माणगाव यांची अल्पवयीन 17 वर्ष 3 महिने वयाची पीडित मुलगी रा. माणगाव हिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आरोपी याने पीडित मुलगी हिला त्याचे मिठीत घेतल्याचे फोटो काढून सदर फोटोचे इंस्टाग्राम व्हिडीओ रील्स बनवून सदरचे व्हिडीओ पीडित मुलीला माहित नसताना आरोपी याने त्याच्या स्वतःच्या इंस्टाग्राम आयडीवर अपलोड करून व्हायरल केले.या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.