शेकापने अनेकांना नोकर्या दिल्या: पंडीत पाटील
। वाघ्रण । वार्ताहर ।
शेकापने अनेकांना नोकर्या दिल्या असे प्रतिपादन मा.आ.पंडीत पाटील यांनी ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाडचे माध्यमिक शिक्षक विकास दत्तात्रेय पाटील यांच्या सेवानिवृत्त सत्कार समारंभात केले.
या कार्यक्रमात विकास पाटील यांचा सत्कार समारंभ व सोबत त्यांच्या आईचा वाढदिवस समारंभ पोयनाड येथील पाटील ब्रदर्स या हॉटेलच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी स्पष्ट वक्ते व परखड विषद होणारे विकास पाटील यांच्याबद्दल अनंत वारे अध्यक्ष शिक्षक संघ, विलास भोनकर शिक्षक, मुख्याध्यापिका वनिता म्हात्रे, आत्माराम पाटील, अनिल ठाकूर, अनिता पाटील, एम.के.पाटील, प्रभाकर भगत, प्रमुख अतिथी राजाराम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक उदय पाटील यांनी विकास पाटील यांचा जीवनपट सादर केला तर पत्रकार दिपक पाटील यांनी सूत्रसंचलन केले.