। म्हसळा । वार्ताहर ।
नामदेव महिला परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच घाटकोपर येथे यशस्वीरित्या पार पडली. या सभेला मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, तळा, म्हसळा, अलिबाग, कोल्हापूर, इचलकरंजी, पनवेल येथील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. अध्यक्षा आशालता वेल्हाळ यांनी उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्षा आशालता वेल्हाळ यांनी प्रास्ताविक म्हणून महिला परिषदेची माहिती, कार्य, सभेचे आयोजन याबद्दल माहिती सांगितली. विश्वस्त उषा पोरे पुणे , हेमा खांडके शैला पाडळकर, अध्यक्षा आशालता वेल्हाळ, उषा मुळे, माजी अध्यक्ष सरोज उरणकर सर्वांनी दीपप्रज्वलन केले. प्रथम कार्यकारी मंडळाला शुभेच्छा व नवीन अध्यक्षांचे स्वागत केले अभिनंदन करून नामदेव महिला परिषदेच्या कार्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, वादळ, टोळधाड ,भूकंप ,अतिवृष्टी या नैसर्गिक, मानवनिर्मित संकटांना तोंड देत समाजबांधवांनी मोठे कार्य केले. माणुसकी हा धर्म पाळला. स्वतःच्या जीवावर उदार होऊन मदत, कर्तव्य, आपुलकीच्या भावनेने जे कार्य केले त्याचा गौरव करण्यात आला. कोरोना योद्धा म्हणून घोषित केले. याच काळात देवाज्ञा झालेल्या ना .स.प चे माजी अध्यक्ष सुधीर पिस , नामदेव महिला परिषदेच्या मुख्य विश्वस्त डॉ.शीला माळवे, माजी अध्यक्षा शोभा कराडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.