। नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स फाऊंडेशन स्कूलच्या ज्युनिअर कॉलेजचा निकाल 98.71 टक्के लागला असून संचिता संजय भोय ही विद्यार्थीनी 78.83 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. तर आर्यन जगदीश पाटील 75 टक्के व ओमकार विजय जांबेकर 72.83 टक्के हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स फाउंडेशनच्या शाळा समितीचे अध्यक्ष चेतन वाळंज व प्रा.योगेश परचुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.