आपटा | वार्ताहर |
आपटे गावातील मोरीला दोन्ही बाजूला कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, जर ऐन पावसाळ्यात मोरीला जास्त प्रमाणात पाणी आले तर लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तरी मोरीवरील दोन्ही बाजूंना कठडे तातडीने बांधणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच कचर्या योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपटा गावात घंटागाडी सुरु केली पाहिजे. कारण, कचरा हा गावातील तळ्यात टाकला जातो. त्यामुळे तळ्याचे खराब होत असून, तसेच परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तरी घंटागाडी लगेचच चालू करण्यात यावी, म्हणजे कचरा तळ्यात टाकण्यात येतो तो बंद होईल, अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.