। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे सुरू असलेल्या राजकीय भूकंपामुळे राजकारणात दिवसागणिक घडामोडी पाहायला मिळत आहेत. सर्वच राजकीय नेत्यांमध्ये चर्चा, आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. तर, आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात सर्व आमदार, खासदार, कार्यकर्ते एकंदरित सर्व शिवसैनिकांची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असून ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.