। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील जसखार येथे आशिर्वाद स्वय सहायता समूह महिला बचत गट यांच्या वतीने सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचे सरपंच दामूशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सदस्य जयवंत घरत,जयश्री म्हात्रे ,योगिता ठाकूर, रिना भोईर,प्रतीक्षा ठाकूर,मोरेश्वर घरत, जि प सदस्य विजय भोईर,पं.स. सदस्य दिपक ठाकूर ,तहसिलचे अधिकारी बिरासदार,पंचायत समिती अधिकारी राम मदने ,बचत गटाच्या प्रीती ठाकूर,आशीर्वाद स्वय सहायता बचत गट अध्यक्ष रविता ठाकूर,सचिव श्रद्धा ठाकूर,खजिनदार ,वैशाली ठाकूर, सदस्या, कीर्ती ठाकूर,शारदा म्हात्रे,देवयानी म्हात्रे ,भारती तांडेल , सामाजिक कार्यकर्ते ,दिनानाथ ठाकूर आदी उपस्थित होते .
महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन सरकारमान्य धान्य दुकान सुरु केले आहे या सर्व महिलांचे मी कौतुक करतो .त्यांना पुढील काळात मी सदैव सहकार्य करीन.
दामू शेठ घरत सरपंच जसखार