। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील मौजे भांनग येथे माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत सदर योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असून अनंत गीते यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन पार पडले.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके, भानंग सरपंच रघुनाथ वाघरे,तळा नगरपंचायतीचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक यांसह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व भानंग ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालुबाजा व पारंपरिक लेझीम च्या तालावर नाचत गावकर्यांनी अनंत गीते व ईतर मान्यवर यांचे स्वागत केले.तसेच या योजनेमुळे भांनग गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असून पाण्यावाचून नागरिकांचे होणारे हाल आता या योजनेमुळे थांबणार आहेत.