। जम्मू । वृत्तसंस्था ।
कोरोनाकाळात मागील दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र गुरुवारपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान आणि प्रशासन अर्लट झाले आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलिस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे.