। ठाणे । प्रतिनिधी ।
दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यामुळं अनेक दुचाकीस्वरांचे मृत्यू होतात. यावर्षीदेखील तेच अपघात पुन्हा सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. ठाण्यात खड्ड्यांमुळं एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावर्षीच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळं गेलेला हा पहिला बळी आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. मागून येणाऱ्या महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी बाईकवरुन प्रवास करत असताना चालकाचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्यानंतर मागून आलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच ठिकाणी थोड्या वेळाच्या अंतराने आणखीन एक बाईकस्वर खड्ड्यामुळे पडल्याची घटना घडली.