संतोष पाटील
भाई, आम्हा तरुणांसाठी आपण एक आदर्श आहात. आदर्श लोकनेता कसा असावा, याचे साक्षात उदाहरण आपण आहात. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय मंडळींची उदाहरणे दिली जातात. परंतु, आमच्याजवळ आपल्यासारखे एवढे मोठे ‘माईलस्टोन’ असताना, आम्हाला दुसरीकडे बघण्याची कधी गरज भासली नाही. कष्टकरी आणि शेतकर्यांसाठी कसे लढायचे, हे आम्हाला तुम्ही शिकविलेत.
आपल्या 67 वर्षांच्या हयातीत आपण या रायगड जिल्ह्यातील चार पिढ्यांना जवळून पाहिलेत. राजकारणाचे बाळकडू आपले आजोबा ना.ना. पाटील (आप्पासाहेब) आणि वडील प्रभाकर पाटील (भाऊ) आणि काका ख्यातनाम विधिज्ञ दत्ता पाटील यांच्याकडून मिळविलेत. शिक्षण, उद्योग, शेती, राजकारण, साहित्य व कला या क्षेत्रात आपला कर्तबगारीचा ठसा उमटवून एक नवीन आदर्श आपण रायगडसह महाराष्ट्रासमोर ठेवलेत. भाई जयंत पाटील म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. राजकारण, सहकार, शैक्षणिक, उद्योग या क्षेत्रात आपण विशेष प्राविण्य मिळविलेत. राजकारणात तर पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर आमदार असा प्रवास केलात. 27 जुलै 2000 ला आपण पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार झालात.
गेली चार वेळा आपण विधान परिषदेचे सदस्य आहात. आणि, ज्येष्ठ सदस्य म्हणून आपल्याला हंगामी विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधीदेखील मिळाली. सहकार क्षेत्रात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 1985 साली जो प्रवास सुरु केलात, तो आजतागायत अगदी दिमाखाने सुरू आहे. 1985 ते 97 या काळात आपण आर.डी.सी.सी. बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलेत. तर, 1997 पासून आजपर्यंत बँकेचे अध्यक्ष आहात. महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव उदाहरण असेल, की गेली 25 वर्षे आपण रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहात. आपण आपल्या अध्यक्ष काळात आर.डी.सी.सी. बँकेने अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. आज राज्याचा विचार करता अनेक बँका आपली विश्वासार्हता गमावत आहेत. परंतु, आर.डी.सी.सी. बँकेबरोबर भाई जयंत पाटील हे असे समीकरण आहे की, या समीकरणामुळे जनसामान्यांच्या मनात विश्वासच विश्वास आहे. सहकार क्षेत्र जगला तर सर्वसामान्यांची उन्नती होईल, हे आपले सूत्र तंतोतंत पाळून ग्रामीण भागातील सहकार चळवळ आपण जिवंत ठेवली आहात.
शैक्षणिक क्षेत्रातदेखील आपण उंच भरारी घेऊन पी.एन.पी. शैक्षणिक संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाचा जाळे विणले आहे. आपल्या या कार्यासाठी आपली स्नुषा चित्रलेखाताईंचा आपल्याला मोलाचे सहकार्य आहे. आज ग्रामीण भागामध्येदेखील आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडून सर्वसामान्यांची मुलेदेखील उच्च विभूषित कशी होतील, याकडे आपण आवर्जून लक्ष दिलेले आहे. त्यामुळे राजकारणाच्या सोबत शैक्षणिक क्षेत्रालादेखील आपण झुकते माप दिल्याने नक्कीच शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी देदीप्यमान आहे. उद्योग क्षेत्रातीलदेखील आपली भरारी फक्त रायगड जिल्ह्यापुरती अथवा महाराष्ट्रापुरतीच नाही, तर देशाबाहेरही घेतली आहे. पी.एन.पी. कॅटमारान्सच्या माध्यमातून मुंबईतून अलिबागकडे येणार्या पर्यटकांसाठी आपण जलवाहतूक सुविधा उपलब्ध करून अलिबागच्या पर्यटनासदेखील मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे राजकारणाव्यतिरिक्त आपण सर्व क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या नावाचा ठसा उमटविलेला आहे.
भाई, आम्हा तरुणांसाठी आपण एक आदर्श आहात. आदर्श लोकनेता कसा असावा, याचे साक्षात उदाहरण आपण आहात. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय मंडळींचे उदाहरणे दिली जातात. परंतु, आमच्याजवळ आपल्यासारखे एवढे मोठे माईलस्टोन असताना, आम्हाला दुसरीकडे बघण्याची कधी गरज भासली नाही. कष्टकरी आणि शेतकर्यांसाठी कसे लढायचे हे आम्हाला तुम्ही शिकविलेत.
माझ्या लेखाला पूर्णविराम देण्याअगोदर मला आवर्जून डोलवी एमआयडीसीमध्ये बाधित असलेल्या शेतकर्यांच्या वतीने धन्यवाद द्यायचे आहेत. मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये आपण राज्य सरकार भूसंपादनाचा नवीन कायदा करण्यास भाग पाडलात. त्या कायद्यानुसार ज्या धनदांडग्यांनी कवडीमोल भावाने शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनी ज्या वेळेला विकल्या जातील, त्या वेळेला नवीन मालकाकडून मूळ मालकाला जमिनीच्या मोबदल्याची 50 टक्के रक्कम देण्यात यावी. हा कायदा झाल्याने नक्कीच ज्या कुणी जमिनी विकल्या असतील, त्यांना याचा फायदा होणार आहे. हा कायदा करण्यास शासनाला आपण भाग पाडलेत, त्याबद्दल शतश: आभार. आपल्याला दीर्घाायुष्य लाभो, ही पाटेणेश्वर चरणी प्रार्थना.






