| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
झिराड ग्रामपंचायत व जेएसडब्लू संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने झिराड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचा शुभारंभ रायगड बाजारचे चेअरमन ऩपाल पाटील यांच्या हस्ते झाले. या शिबीरात शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
जेएसडब्लू संजीवनी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातील डॉ. धुळेश गोरड, डॉ. पलक शर्मा, ओमकार कटक, सिध्दार्थ शिंदे, विनीत पाटील, अक्षय म्हात्रे, सुबोध पाटील, किर्तेश पाटील, मोनिका पाटील, अपेक्षा पाटील, सोनाली थळे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पोटाचे विकार,आम्लपित्त, नेत्ररोग, संधिवात, गर्भाशय, मुत्राशय, सांधे, किडनी, श्वसनाचे विकार, स्त्रियांची मासिक पाळी, त्वचारोग, हृदयरोग, मणक्याचे विकार, अशा अनेक आजारांवर लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करून मोफत औषधे देण्यात आली.
तपासणीत निदान झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रीया जेएसडब्लू संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती तेथील तज्ञांकडून देण्यात आली. दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.