| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती पनवेल शाखा, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन आणि ईतर सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात एकूण 50 जणांनी उपस्थिती होती. तसेच 30 जणांनी यावेळी रक्तदान केले. अंनिसच्या सुशीला मुंडे, राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दिन शेख, पत्रकार व संपादक किरण बाथम, ईतर राज्य कार्यकर्ते व रोटरी क्लबचे आणि पनवेल येथील शेलार हॅास्पीटल च्या डॅाक्टर शेलार यावेळी उपस्थित होते. यावेळी अल्लाउद्दिन शेख यांनी बकरी ईदबाबतची माहिती दिली. या रक्तदानास येणार्या प्रत्येकाने मोफत आरोग्य तपासणी केली. जेष्ठ कार्यकर्त्या सुशीला मुंडे यांनी सर्व सहभागी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.







