| पनवेल । वार्ताहर ।
पावसामुळे खारघर वसाहतीमधील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. महापालिकेकडून डागडुजीची कामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र ङ्गसकाळफच्या वृत्तानंतर सिडकोनेही रस्ते, पदपथ आणि मॅनहोलच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
महापालिकेकडे खारघर वसाहती हस्तांतराच्या वेळी येत्या पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविणे, उघडे मॅनहोल आणि पदपथाची कामे सिडकोकडून करण्यात यावीत, असे ठरले होते. मात्र पावसाळ्यात खारघरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली होती. खारघरमधील रस्ते, पदपथ आणि मॅनहोलच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सिडको अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदार एजन्सीकडून जून महिन्यापासून रस्ते आणि पदपथांची कामे सुरू आहेत. सदर एजन्सीने चार पथके तयार केली असून 40 कामगार विविध सेक्टरमध्ये काम करीत आहे.