। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका पंचायत समितीचे आरक्षण गुरुवारी (दि.28) जाहीर करण्यात आले. माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय भवन येथे तालुक्याच्या तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांनी आरक्षण जाहीर केले. यावेळी नायब तहसीलदार बी.वाय.भाबड यांच्यासह विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
माणगाव तालुका पंचायत समितीत एकूण 10 गण आहेत. मागील निवडणुकीत माणगाव पंचायतीत आठ गण होते. आता करंबेली व लोणशी हे दोन नवीन गण समाविष्ट झाल्याने एकूण 10 गण झाले आहेत. त्यामध्ये तळाशेत पंचायत समिती गण नामाप्र महिला, पेण तर्फे तळे सर्वसाधारण महिला, पाटणूस सर्वसाधारण महिला, निजामपूर सर्वसाधारण, करंबेली सर्वसाधारण महिला, लोणेरे नामाप्र, लोणशी सर्वसाधारण, मोर्बा अनुसूचित जमाती, मांजरवणे अनुसूचित जाती महिला, गोरेगाव सर्वसाधारण आरक्षित झाले आहे. माणगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने आता विविध पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.