। पेण । प्रतिनिधी ।
पेण पंचायत समितीच्या 12 गणांची आरक्षणांची सोडत गुरुवारी (दि.28) तहसिल कार्यालयातील सरदार वाघोजी तुपे सभागृहात काढण्यात आली. यामध्ये काही इच्छुकांच्या अपेक्षा भंग झाल्या तर काहींना अनअपेक्षित आरक्षण मिळाल्याने अपेक्षा उंचावल्या.
पेण तालुक्यात पुर्वी 10 गण अस्तित्वात होते. परंतु नविन जनगणनेनुसार त्यात बदल होऊन बारा झाले. पेणची एकूण लोकसंख्या 1 लाख 57 हजार 602 असून ही लोकसंख्या 12 गणात विभागली आहे.
जिते सर्वसाधारण, वाक्रुळ सर्वसाधारण, रावे सर्वसाधारण महिला, दादर नामप्र महिला, वढाव सर्वसाधारण महिला, वाशी अनुसुचित जमाती महिला, वडखळ सर्वसाधारण, काराव अनुसुचित जमाती, कामार्ली सर्वसाधारण महिला, पाबळ नामप्र, कासू सर्वसाधारण, शिहू नामप्र महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे.
यावेळी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसिलदार प्रसाद काळेकर, नायब तहसिलदार सुनिल जाधव, गटविकास अधिकारी भाउसाहेब पोल, यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.